bg_image

जागतिक दर्जाच्या पोलीस प्रशिक्षणासाठी आधुनिक मूलभूत सुविधा

पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे आम्ही अत्याधुनिक सुविधा प्रदान करतो ज्यामुळे भर्तीला संपूर्ण प्रशिक्षण मिळते. चांगल्या सुसज्ज वर्गखोल्या आणि हॉस्टेलपासून ते प्रगत प्रशिक्षण मैदानापर्यंत, प्रत्येक सुविधा शिस्त, सहनशीलता आणि सर्वांगीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी डिझाइन केली आहे.

निवारा - Image १

निवारा

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक अधिकारी व अंमलदार यांचे राहण्याकरिता निवारा ही इमारत असून सदर इमारतीमध्ये एकुण २० निवासस्थाने उपलब्ध आहेत.

विश्रामधाम व हॉलिडे होम - Image १
विश्रामधाम व हॉलिडे होम - Image २
/

विश्रामधाम व हॉलिडे होम

प्रशिक्षक अंमलदार यांचे विश्रांतीकरिता विश्रामधाम व पोलीस अधिकारी यांचे विश्रांतीकरिता हॉलिडे होम बांधण्यात आलेले आहे.

विश्रामगृह - Image १
विश्रामगृह - Image २
विश्रामगृह - Image ३
विश्रामगृह - Image ४
विश्रामगृह - Image ५
/

विश्रामगृह

पोलीस प्रशिक्षणाकरिता अतिथि, तज्ञ व्याख्याते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता विसावा, रायगड, लोहगड, सिंहगड व पुरंदर हे विश्रामगृह उपलब्ध आहेत.

नवप्रविष्ठ पोलीस शिपाई निवासव्यवस्था - Image १
नवप्रविष्ठ पोलीस शिपाई निवासव्यवस्था - Image २
/

नवप्रविष्ठ पोलीस शिपाई निवासव्यवस्था

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे निवासाकरीता तापी, यमुना, सरस्वती कृष्णा, इंद्रायणी बरेक्स तसेच शिवनेरी व राणी लक्ष्मीबाई होस्टेल उपलब्ध

अन्नपुर्णा भोजनालय - Image १
अन्नपुर्णा भोजनालय - Image २
/

अन्नपुर्णा भोजनालय

एकाचवेळी ७०० प्रशिक्षणार्थी बसू शकतील असे दुमजली भोजनालय आणि आधुनिक यंत्रण सज्ज असे स्वयंपाक घर असलेल्या अन्नपूर्णा भोजनालयामध्ये प्रशिक्षणार्थीना चौरस आहार पुरविण्यात येतो. प्रशिक्षणार्थी नाश्ता आणि जेवणामधून भरपूर प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वे मिळावीत यासाठी फळे, पालेभाज्या, मांसाहार, सला दूध, अंडी, शेंगदाना तसेच हळीवचा लाडू इत्यादी व्यंजनांचा समावेश जेवणामध्ये केला जातो. भोजनालयाचे व्यवस्था प्रशिक्षणार्थीच्या मार्फत केले जाते.

तक्रारपेटी व्यवस्था - Image १

तक्रारपेटी व्यवस्था

प्रशिक्षणार्थीना त्यांच्या तक्रारी गोपनीय स्वरूपात मांडता याव्यात यासाठी वसतीगृह व भोजनालय या ठिकाणी तक्रार पेटीची सुविधा करण्यात आली आहे. महिला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी तक्रारपेटी उघडून त्यातील तक्रारींचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली निवारण करण्याचे काम करतात.

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

२४/७ प्रशिक्षण समर्थन

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

हजारो पुस्तके आणि डिजिटल संसाधने

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

१०+ आधुनिक वर्गखोल्या

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

पूर्ण राजधानी सुविधा

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार