जागतिक दर्जाच्या पोलीस प्रशिक्षणासाठी आधुनिक मूलभूत सुविधा
पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे आम्ही अत्याधुनिक सुविधा प्रदान करतो ज्यामुळे भर्तीला संपूर्ण प्रशिक्षण मिळते. चांगल्या सुसज्ज वर्गखोल्या आणि हॉस्टेलपासून ते प्रगत प्रशिक्षण मैदानापर्यंत, प्रत्येक सुविधा शिस्त, सहनशीलता आणि सर्वांगीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी डिझाइन केली आहे.
व्यायामशाळा व ओपन जिम
महिला व पुरुष प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांचेसाठी ०२ वेगवेगळ्या व्यायामशाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आहेत. जिल्हा क्रिडा विभागाकडून रुपये पाच लाख अनुदान प्राप्त करुन प्रशिक्षणार्थीसाठी स्वतंत्र व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. तसेच ओपन जिम सुद्धा उपलब्ध आहे.
फायरिंग रेंज
प्रशिक्षणार्थी अधिकारी व नवप्रविष्ठ पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थी यांचा गोळीबार सराव हा आय.एन.एस. शिवाजी, लोणावळा, एस.आर.पी.एफ फायरिंग रेंज, वडाची वाडी, पुणे येथील फायरिंग रेंजवर घेण्यात येतो.
स्मृति संग्रहालय
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण कालावधीत केंद्राबाहेरील विविध स्पर्धांमध्ये विजय मिळून प्राप्त केलेली सांघिक पदके, ढाली, चषक तसेच जुनी वाद्ये, स्मृतिचित्रे यांचे प्रदर्शन असलेले स्मृतिसंग्रहालय तयार करण्यात आले आहे.
वैद्यकीय सुविधा
१ महिला वैद्यकीय अधिकारी व ३ वैद्यकीय कर्मचारी व २४ तास उपलब्ध असलेले रुग्णवाहिका यांच्यासह बाह्य रुग्ण विभाग आणि ०६ बेडचा अंतररुग्णविभाग यांनी सुसज्ज असा दवाखाना पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आहे. माणसेवी अस्थिरोग तज्ञ प्रत्येक आठवड्याला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात धनुर्वाताची लस देण्यात येते तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात येते. दवाखान्यामध्ये अँटीवेनम (inj.-SV) लसीसह आवश्यक औषध साठा उपलब्ध असून प्रशिक्षणार्थीना विटामिन, झिंक, आणि लोह यांच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात तसेच प्रशिक्षणार्थीची बी. एम. आय. आणि हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते व आवश्यकतेनुसार संबंधित प्रशिक्षणार्थीकडे विशेष लक्ष दिले जाते तसेच प्रशिक्षणार्थीच्या रनिंग व फायरिंगच्या दरम्यान वैद्यकीय सेवा दिली जाते.
सीसीटीव्ही निरीक्षण प्रणाली
पोलीस प्रशिक्षणकेंद्रामध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव महत्त्वाच्या ठिकाणी जवळपास १२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून त्याद्वारे अहोरात्र निगरानी चालू असते
महत्त्वाचे साईनबोर्डस्
पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील मुख्य रस्ता व ड्रिल शेडमध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे सकारात्मक प्रेरणादायी विचार, कविता असलेले तसेच पोलीस विभाग, लष्करी सेवांचे चिन्हे दर्शविणारे व शस्त्रांची माहिती नाविन्यपुर्ण माहिती फलक लावण्यात आलेले आहेत
शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार
२४/७ प्रशिक्षण समर्थन
शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार
हजारो पुस्तके आणि डिजिटल संसाधने
शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार
१०+ आधुनिक वर्गखोल्या
शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार
पूर्ण राजधानी सुविधा
शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार