सामाजिक उपक्रम क्लब
पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे प्रशिक्षणार्थी यांचे संघटन कौशल्य, नेतृत्वगुण तसेच मांधिक कौशल्य वाढविण्यासाठी वेगवेगळे क्लब तयार करण्यात आले असून सामाजिक उपक्रम क्लब यांचे कामकाज पोनि अंजली खरे, पोनि संतोष पाटील, पोनि अमोल साळ्खे, सपोनि सीमा चौधरी, सपोनि बन्सी यांचेकडे सोपविण्यात आले आहे. शिबीर डॉक्युमेंटरी चित्रपटाचे आयोजन करणे, निबंधलेखन स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मुलींनी स्वतः केलेल्या कवितांचा संग्रह करणे, लिखाण नोटीस बोर्डवर लावून आत्मविश्वास वाढविणे व लिखाणास चालना देणे अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच सामाजिक उपक्रम क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, स्वच्छता अभियान, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम प्रशिक्षणार्थींना त्यांचे विचार मांडण्याची संधी देऊन साजरे केले जातात.