bg_image

सारांश

१ महिला वैद्यकीय अधिकारी व ३ वैद्यकीय कर्मचारी व २४ तास उपलब्ध असलेले रुग्णवाहिका यांच्यासह बाह्य रुग्ण विभाग आणि ०६ बेडचा अंतररुग्णविभाग यांनी सुसज्ज असा दवाखाना पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आहे. माणसेवी अस्थिरोग तज्ञ प्रत्येक आठवड्याला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात धनुर्वाताची लस देण्यात येते तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात येते. दवाखान्यामध्ये अँटीवेनम (inj.-SV) लसीसह आवश्यक औषध साठा उपलब्ध असून प्रशिक्षणार्थीना विटामिन, झिंक, आणि लोह यांच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात तसेच प्रशिक्षणार्थीची बी. एम. आय. आणि हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते व आवश्यकतेनुसार संबंधित प्रशिक्षणार्थीकडे विशेष लक्ष दिले जाते तसेच प्रशिक्षणार्थीच्या रनिंग व फायरिंगच्या दरम्यान वैद्यकीय सेवा दिली जाते.

वैद्यकीय सुविधा
×