bg_image
खंडाळा पोलीस प्रशिक्षण संस्थेचा इतिहास १९६०-२०२४

खंडाळा पोलीस प्रशिक्षण संस्थेचा इतिहास १९६०-२०२४

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणजेच सदवर्तनी लोकांचे संरक्षण तर दूरवर्तनी लोकांचे निर्दालन करण्याचे कंकण घेऊन सर्वसामान्यांचे जीवित आणि मालमत्तेचे रक्षण कशा प्रकारे करावे याबाबतचे प्रशिक्षण देवून परिपूर्ण पोलीस अधिकारी समाजासाठी निर्माण करण्याचा वसा घेऊन या संस्थेची निर्मिती तत्कालीन ए.जी.पी. मुज्जीदऊल्हा सर यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सरकारने (जानेवारी १९६०) रोजी केली. या संस्थेमध्ये पुरुष अंमलदारांच्या ६३ आणि महिला अंमलदारांच्या ३५ तुकड्या परिपूर्ण प्रशिक्षण घेवून जनसेवेसाठी दाखल झाल्या आहेत. अशा या संस्थेच्या वाटचालीचा मागोवा मोठा मनोरंजक आहे

×