bg_image
नामांकित पोलीस प्रशिक्षण केंद्र 2010.

नामांकित पोलीस प्रशिक्षण केंद्र 2010.

इसवी सन १९५८ मध्ये स्थापनेच्या वेळी या प्रशिक्षण संस्थांचे नामकरण प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण विद्यालय असे होते. इसवी सन १९८० च्या सुमारास यातील प्रादेशिक शब्द काढून टाकल्यामुळे पोलीस प्रशिक्षण विद्यालय (पी टी एस) असे संबोधले जात होते. परंतु १८ नोव्हेंबर २०१० पासून या संस्थेचे नामकरण पोलीस प्रशिक्षण केंद्र (पिटीसी) असे करण्यात आले. सुरूवातीपासून या ठिकाणी पुरुष अंमलदारांचे प्रशिक्षण घेण्यात येत असे. सन १९९५ पासून या ठिकाणी महिला अंमलदारांचे प्रशिक्षण घेण्यात येते. पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा कॅपस मध्ये मोडक पॉइंट व वसंत पॉइंट हे दोन निसर्गरम्य पॉईट असून मोडक पॉइंट हा जुन्या मुंबई पुणे हायवे लगत पेट्रोल पंपाजवळ आहे. तेथे बॉटनिकल गार्डन बनवण्यात आले आहे. वसंत पॉइंट हा लोहगड विश्राम गृह पासुन गणपती मंदिराकडे जाताना आहे. आजही तेथे वसंत पॉइंट हे नाव पायऱ्याजवळ कोरलेले आहे. दि. ३० / ११ / २००४ रोजी सध्या ज्या जागेत पोलीस वेलफेयर सोसायटी आहे त्या ठिकाणी पोलीस महानिरीक्षक श्री राकेश मारिया यांच्या हस्ते दोन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले व नंतर नमुद जागेत नव प्रविष्ट पोलीस अंमलदार अधिकारी व कर्मचारी यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर नित्याच्या गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी पोलीस वेलफेयर स्टोअर दि ०९/०५/२०१४ पासून सुरु करण्यात आले आहे. दि. १७/०४/२०१५ रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर शांतिस्थळ व राजमाची या विश्राम गृहाचे उद्घाटन तात्कालीन प्राचार्य श्री. रविंद्र सेनगांवकर साहेब यांनी केले. पोलीसांच्या धावपळीच्या व तणावपूर्ण जीवन शैली मध्ये योगा चे असलेले महत्व लक्ष्यात घेवून पोलीस कवायत मैदानाला लागून पाण्याच्या प्रवाहाजवळ दि. १८/ ०४/२०१६ रोजी अपर पोलीस महासंचालक डॉ. के व्यंकटेशम यांनी योग कुटीर ची निर्मिती केली. महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला पोलीस प्रशिक्षण संस्था असल्याने दरवर्षी महिला पोलीस अंमलदाराची संख्या वाढत गेली व त्यामुळे वर्ग संख्या वाढविणे गरजेचे होते याचा विचार करुन राज्य सरकारने पोलीस हाउसिंग बोर्ड च्या मार्फत नवीन प्रशासकीय इमारत व ज्ञानप्रकाश विद्या संकुल बांधण्याचा निर्णय घेतला व दि. २४/०८/२०१६ रोजी मा. श्री सतीश माथुर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य याचे हस्ते नवीन प्रशासकीय भवन व ज्ञान प्रकाश विद्या संकूल चा भूमीपुजन समारंभ झाला व दोन वर्षानंतर सर्व सुविधा युक्त इमारती तयार झाल्या. दि. १९/११/२०१८ रोजी मा. पोलीस महासंचालक श्री दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले व तेव्हापासून सदर इमारती पोलीस प्रशिक्षण साठी वापरण्यात येत आहेत. ज्ञान प्रकाश या ठिकाणी वर्ग १ ते ६, स्वामी विवेकानंद विद्यासंकुल मध्ये ७ ते १२ व धोंडो केशव कर्वे संकुल मध्ये वर्ग आली आहे. १३ ते १५ वर्ग घेतले जातात . एका वेळी ८०० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याची क्षमता खंडाळा येथे करण्यात स्मृतीसंग्रह हे दालन या संस्थेचा इतिहास आजही ताजा करते व जुन्या स्मृतीना उजळा देते. सदर दालन दि. १४/१०/२०२१ रोजी अप्पर पोलीस महासंचालक श्री संजय कुमार यांनी प्राचार्य शशिकांत बोराटे यांच्या कार्यकाळात सुरु केले. स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस आणि सक्षम पोलीस हा एक नाविन्यपूर्ण १० दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम सेवा अंर्तगत पोलीस अधिकाऱ्यांसाठी देण्यात येतो . भारत सरकार गृह विभाग प्रायोजित नॅशनल इमरजेंसी रिस्पॉन्स सर्विस या धर्तीवर डायल ११२ चे १२ दिवसाचे प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे देण्यात येते. ऑफिसर्स प्रोफेशनल स्कील अपग्रेडेशन (ओ. पी. एस. यु) १ व २ चे प्रशिक्षण १० ते १५ वर्षे व १५ ते २५ वर्षे सेवा झालेल्या पोलीस अधिकारी याना १२ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक, सागरी सुरक्षा रक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सेंट्रल जी एस टी व कस्टम अधिकारी यांना देखिल प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. ७२६ प्रशिक्षणार्थी यांना राहण्याची व्यवस्था शिवनेरी व राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी केली जाते. तेथे २४ तास गरम पाण्यासाठी सोलर वॉटर हिटर प्रणाली वापरली जाते. सदर हॉस्टेल मध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडर मशिन बसविले आहेत व त्याच्या डिस्पोजल साठी पॅड केअर बीन्स बसविण्यात आलेल्या आहेत. नमुद हॉस्टेल इमारती शिवाय तापी aa, कृष्णा बरॅक, यमुना बरॅक, सरस्वती बरॅक व इंद्रायणी बरॅक या ठिकाणी अतिरिक्त प्रशिक्षणार्थी यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. ५००० हून अधिक पुस्तके असलेले अद्ययावत ग्रंथालय मा. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री संजय कुमार यांच्या हस्ते सुरु करण्यात आले आहे व सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ई-लायब्ररी सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे: पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी प्राचीन कालीन चर्च च्या वास्तूमध्ये सहयाद्री हे परिषद कक्ष असून मंथन, ज्ञान ज्योती, नालंदा व तक्षशीला असे आधुनिक सुविधा असलेले अद्यायावत प्रशिक्षण हॉल ची व्यवस्था आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा चा सर्व परिसर सीसीटीव्ही ने कव्हर केला आहे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जुन्या साहित्याचा वापर करुन टाकावु पासून टिकावु या उपक्रमा अंतर्गत पालक प्रतीक्षालय व मॉडेल पोलीस ठाणे यांचे काम करण्यात आले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पालापाचोळा चा वापर करुन गांडुळ खत व कंपोस्टिंग प्रोजेक्ट सुरु करण्यात आले आहे . पोलीस वेलफेअर योजने अंतर्गत पोलीसांच्या कल्याणकारी योजनाना निधी प्राप्त व्हावा यासाठी दि १०/०९/२०२३ रोजी पासून हिंदुस्थान पेट्रोलियम च्या सहकार्याने पेट्रोल पंप सुरु करण्यात आला असुन त्याचे उद्घाटन मा. पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) श्री संजय कुमार यांचे हस्ते करण्यात आले आहे. नमुद पेट्रोल पंप चालु करण्याची प्रक्रिया प्राचार्य श्री. शशिकांत बोराटे यांच्या कार्यकाळात सुरु झाली व उद्घाटन समारंभ प्राचार्य श्री. एम.एम. मकानदार यांच्या कार्यकाळात झाले. पेट्रोल पंप सुरु करणारी महाराष्ट्रतील ही पहिली प्रशिक्षण संस्था आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा

×