प्राचीन कालीन पोलीस प्रशिक्षण पद्धती
साडेतीन हजार वर्षांची उज्वल परंपरा लाभलेल्या हिंदुस्तानी पोलीस कार्यपद्धतीने जागतिक पोलीस कार्यपद्धतीला अनेक बहुमोल परंपरा बहाल केलेल्या आहेत त्यापैकी पोलीसांचे प्रशिक्षण ही एक होय . ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग (१७३२-१८१८) यांनी १७७४ रोजी हिंदुस्थानाच्या पारंपारिक पोलीस कार्यपद्धतीबद्दल चा प्रशंसा उद्गार आपल्या इंग्लंड स्थित कंपनीला कळविलेले आहेत. हिंदुस्थानात मध्ययुगाच्या सुरुवातीपर्यंत जवळपास ही पारंपारिक कुटुंबानुसार पोलीस कार्यपद्धती अमलात होती. मध्ययुगामध्ये फौजेचा प्रमुख असलेला फौजदार हा नगरांमध्ये कोतवाल आणि ग्रामांमध्ये पाटील यांची नेमणूक करून पोलीस विषयक काम करीत असे. ईस्ट इंडिया कंपनीने १८ व्या शतकाच्या अखेरीस या देशांमध्ये आपली प्रशासन व्यवस्था सुरू करून जिल्हा हा प्रमुख घटक मांडला.जिल्हयाचा प्रमुख असलेला कलेक्टर याच्या अधिपत्याखालीच पोलीस प्रशासन ठेवले . जिल्हा पोलीस मुख्यालयांमध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस अंमलदारांना पहा -निरीक्षण करा-अनुभव घ्या आणि शिका ही प्रशिक्षण पद्धती काही काळ चालू होती.