पहिली पोलीस शाळा १८५९
३ मार्च १८६१ रोजी संमत झालेल्या हिंदुस्तानी पोलीस अधिनियम मध्ये पोलीस शिक्षणाची तरतूद प्रथमच करण्यात आलेली होती, तत्पूर्वी हिंदुस्थानातील पहिली पोलीस शाळा १ नोव्हेंबर १८५९ पासून मद्रास प्रेसिडेन्सी मधील पहिले इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस जी.डब्ल्यू रॉबिन सन्स यांनी वेल्लोर येथे सुरू केली होती. आपल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये मात्र १८६७ मध्ये लारखाना (आता पाकिस्तान) अहमदनगर आणि बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयांमध्ये पोलीसांना शिक्षण देणाऱ्या पहिल्या पोलीस शाळा सुरू करण्यात आल्या. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पूर्ण हिंदुस्थानाप्रमाणेच बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये देखील प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस शाळा कार्यरत झाल्या होत्या.