पोलीस अधिकाऱ्यांसाठी मध्यवर्ती प्रशिक्षण शाळा १९०६
इसवी सन १९०२ मध्ये हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल फेजर कमिशनच्या शिफारसी प्रमाणे सन १९०६ पासून हिंदुस्थानातील प्रत्येक प्रेसिडेन्सी मध्ये पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सेंट्रल पोलीस ट्रेनिंग स्कूल (सीपीटीएस) निर्माण करण्यात आल्या.आपल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये १ जुलै १९०६ पासून पुणे येथील भांबुर्डी (आत्ताचे शिवाजीनगर ) पोलीस मुख्यालयामध्ये पहिली प्रशिक्षण शाळा सुरू करण्यात आली. तीन वर्षानंतर हलविण्यात आली. आता तिचे रूपांतर पोलीस अकादमी मध्ये झाले आहे.