bg_image
खंडाळा प्रशिक्षण शाळेत पहिली तुकडी दाखल १९६२

खंडाळा प्रशिक्षण शाळेत पहिली तुकडी दाखल १९६२

प्राचार्य कुलकर्णी सरांच्या कार्यकाळामध्येच १ एप्रिल १९६२ पासून प्रशिक्षणार्थीची पहिली तुकडी या संस्थेची प्रशिक्षणासाठी दाखल झाले. या प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण संस्थेतील पहिल्या तुकडीला विनोदाने प्री मॅच्युअर बेबी (ब्ल्यू बेबी) असे म्हटले जाते. कारण असे घडले की, पहिल्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षण काळातच भारत चीन युद्धाचे वारे गोंगावु लागले होते. अखेर सप्टेंबर १९६२ मध्ये चीनने आपल्या देशावर आक्रमण केल्याने अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आणि केवळ या कारणासाठीच येथील प्रशिक्षणार्थीना रातोरात आपापल्या जिल्ह्यांमध्ये कर्तव्यासाठी रुजू होण्याचे आदेश झाले. या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण केवळ पाच महिने झाले होते उर्वरित प्रशिक्षण आपापल्या जिल्हा प्रशिक्षण शाळांमधून पूर्ण करून घेण्यात आले या प्रीमॅच्युअर बेबी तुकडीने येथील परेड ग्राउंड तयार करण्यासाठी नाल्याच्या पात्रातील दगड धोंडे रचून घातलेला बांध आजही त्यांची आठवण करून देत उभा आहे. परेड ग्राउंड बरोबरच म्हणजेच अडथळ्यांच्या जागाही नव्याने तयार करण्यात आल्या होत्या.

×