bg_image
प्रशिक्षण शाळेसाठी पहिले भूसंपादन १९६५

प्रशिक्षण शाळेसाठी पहिले भूसंपादन १९६५

दिनांक ३० सप्टेंबर १९६५ रोजी भूमी संपादनासाठी विशेष गॅझेट प्रसिद्ध केले. भूमी संपादनासाठी प्रक्रिया सुरू झालेली असताना सन १९६६-६७ च्या अंदाजपत्रकामध्ये या भूमी संपादनासाठी एक लाख तीस हजार रुपये रकमेची मान्यता देऊन त्या अंदाजपत्रकामध्ये ३०,००० रुपयांचा निधी देखील प्राचार्यांना उपलब्ध करून देण्यात आला. सर्व कायदेशीर अडचणी दूर झाल्यावर महाराष्ट्र सरकारने १४ सप्टेंबर १९६७ रोजी जागा पोलीस प्रशिक्षण विदयार्थ्यांच्या विद्यालयासाठी संपादित केल्याचे गॅजेट प्रसिद्ध केले. जागेचा ताबा मिळताच तत्कालीन प्राचार्यानी आपले दुसरे पोलीस परेड ग्राउंड तयार करण्याचे काम प्रशिक्षणार्थीच्या सहभागातून सुरू केले. मुळ सेंट पीटर स्कूलच्या पूर्वेकडील भाग आता या ठिकाणी प्राचार्य बंगला, उद्यान, मुन्सिपल स्कूल क्लासरूम ची नवीन इमारत, इलेक्ट्रिक केबिन, मारुती मंदिर शेजारील भाग, नवीन मेस, शिवनेरी वसती गृह हा होय. इसवी सन १९६० मध्ये फक्त सेंट पीटर गर्ल्स स्कूलच्या छोट्याशा म्हणजेच २६ एकर १५ गुंठे जागेमध्ये प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण शाळा सुरू करण्यात आले परंतु १९६२ मध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली त्यावेळी मात्र ही जागा अत्यंत अपुरी पडू लागली. सेंट पीटर स्कूलच्या पूर्वेला लागूनच क्रिसली हिल नावाने ओळखल्या जाणाऱ्या तुंगालीं गावाच्या हद्दीत सर्वे नंबर १६६ आणि १२४ एक दोन या जागेमध्ये दोन जुनाट बंगले आणि एक आऊट हाऊस असे तीन बिल्डिंग होत्या. नमुद ठिकाणी जुन्या काळातील दगडी बांधकाम असलेली इमारत असून तेथे अधिकारी निवासस्थान आहे व जवळच तोरणा RH आहे व त्याच्या मागे मदर तेरेसा रुग्णालय होते. नमुद रुगणल्याचे दि ०२/०२/२०१५ रोजी नूतनीकरण करण्यात आले होते परंतु सध्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये रुग्णालय असल्याने नमुद जागेचा वापर केला जात नाही. पोलीस प्रशिक्षण स्कूल, खंडाळा येथे जागेची अत्यंत कमतरता असल्याचा प्रश्न शासनासमोर देखील प्रलंबित होताच माननीय पोलीस महानिरीक्षकांनी दिनांक २९ ऑगस्ट १९६७ रोजी नमूद जमीन संपादन करण्याची शिफारस केली. शासनाने तत्त्वत मंजुरीचा आदेश दिल्यानंतर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने भूसंपादन कायदा प्रमाणे ही जागा संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यासाठी दिनांक २७ जानेवारी १९७१ रोजी गॅजेट प्रसिद्ध केले. नमुदच्या कालावधीत आयजीपी माजीदुलूया यानी डिसेंबर १९६७ मध्ये 'हॉलिडे होम' या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी च्या विश्रांती गृह चे बांधकाम सुरु केले . सद्या हॉलिडे होम मोटर वाहन विभागाच्या जवळ असून त्याठिकाणी असलेला फाउंडेशन स्टोन १९६७ च्या आठवणीना ताजे करतो. हॉलिडे होम च्या बाजुला दि १४/४/१९६९ या दिवशी कल्याण धाम, नावाचे पोलीस अधिकारी व आमलदार यांच्या साठी विश्राम गृह सुरु करण्यात आले व त्याचे भुमीपूजन मा. उप गृहमंत्री श्री कल्याणराव पाटिल यांचे हस्ते करण्यात आले. नमुद फाउंडेशन स्टोन आजही सदर विश्राम गृह भिंतींवर आहे. शासनाच्या जागा संपादनाच्या निर्णयानंतर अनेक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या. या सर्व कायदेशीर बाजूंना तोंड देत शासनाने दिनांक १५ जानेवारी १९७५ रोजी गॅजेट प्रसिद्ध करून पाच एकर पस्तीस गुंठे जागा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संपादित केल्याचे जाहीर केले. यानंतरची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अखेर २५ ऑगस्ट १९८० रोजी या बंगल्याच्या किल्लया, जमिनीची कागदपत्रे आणि जागेचा नकाशा तत्कालीन प्राचार्य बी. एस. गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यथावकाश या जागेचा प्रशिक्षणार्थीनी वेळोवेळी अंग मेहनत करून विकास केला. बंगला नंबर एक रिव्हर साईड बंगल्याची मोठ्या प्रमाणात डागडुजी झाल्यानंतर तत्कालीन प्राचार्य यांनी दिनांक १ ऑगस्ट १९८१ रोजी या बंगल्यामध्ये निवासस्थानासाठी प्रवेश केला त्यानंतर सर्व प्राचार्य या बंगल्यांमध्ये राहत आहेत. २६ मार्च १९८२ रोजी गुढीपाढव्याच्या दिवशी पोलीस महानिरीक्षक श्री के. पी. मेढेकर यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी यांच्यासाठी विश्राम गृह चा पायाभरणी समारंभ झाला व तेथे आता हॉलिडे होम जवळ सुंदर विश्राम गृह आहे. बंगला नंबर दोन मध्ये मुलांसाठी शाळा सुरू केलेली आहे. या प्राचार्य बंगल्या समोर आता एक मोठे उद्यान विकसित करण्यात आलेले आहे समोरील रस्त्याच्या पलीकडे प्रशिक्षणाची निवास व्यवस्था असलेले शिवनेरी वसतिगृह आहे. एकाच वेळेला ८०० ते हजार प्रशिक्षणार्थीची भोजन व्यवस्था होईल असे एक भोजनगृह करण्यात आलेले आहे. या सर्व भव्य वास्तू महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आलेले आहे.

×