मियावॉकी वृक्षारोपण
प्रशिक्षण केंद्राच्या आवारामध्ये वृक्ष संवर्धनासाठी मियावाँकी पद्धतीने वृक्ष लागवड.
सौर ऊर्जा प्रकल्प
पोलीस प्रशिक्षण केंद्राला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडून 25 लाख रुपयांची अनुदान मिळाली आहे. सौर वीज प्रामुख्याने प्रशासकीय इमारती आणि वर्गखोल्यांमध्ये वापरली जाते.
सोलर वॉटर हिटर
वसतीगृहावर लावलेल्या सोलर वॉटर हिटरद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना 24 तास गरम पाणी पुरवले जाते.
पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा वेलफेअर पेट्रोल पंप
पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा वेलफेअर पेट्रोल पंप हा समुदाय सेवा उपक्रम आहे जो स्थानिक समुदायाला इंधन सेवा प्रदान करतो तर प्रशिक्षण केंद्रासाठी उत्पन्न निर्माण करतो.
सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट आणि पुनर्वापर
वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनमुळे पर्यावरणाचा हास होऊ नये याकरता ती नाश करण्याची मशीन वसतीगृहात लावण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनपासून कागद तयार करण्यात येत आहे.
गांडूळ खत प्रकल्प
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पालापाचोळा इत्यादीचा वापर करून गांडूळखत प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे गांडूळ खताची निर्मिती केली जाते.