bg_image

जागतिक दर्जाच्या पोलीस प्रशिक्षणासाठी आधुनिक मूलभूत सुविधा

पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे आम्ही अत्याधुनिक सुविधा प्रदान करतो ज्यामुळे भर्तीला संपूर्ण प्रशिक्षण मिळते. चांगल्या सुसज्ज वर्गखोल्या आणि हॉस्टेलपासून ते प्रगत प्रशिक्षण मैदानापर्यंत, प्रत्येक सुविधा शिस्त, सहनशीलता आणि सर्वांगीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी डिझाइन केली आहे.

मॉडेल पोलीस ठाणे - Image १

मॉडेल पोलीस ठाणे

प्रशिक्षणार्थीना पोलीस ठाण्याचे दैनदिन कामकाज कसे चालते याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये भेट आयोजित केली जाते. परंतु, पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोडेल पोलीस ठाणे उभारण्यात आले असून त्यामध्ये पोलीसांच्या दैनदिन कामकाजाचे विविध रजिस्टर, विविध कक्ष, विविध विभाग तसेच कामकाज व जबाबदाऱ्या यांची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ड्रिल शेड - Image १

ड्रिल शेड

बाहयवर्ग प्रशिक्षणासाठी विस्तीर्ण कवायत मैदान असून, खंडाळा येथे भरपूर पाऊस पडत असल्याने पावसाळ्यामध्ये प्रशिक्षणात खंड नको म्हणून बाहयवर्ग प्रशिक्षणासाठी तब्बल २२,००० THIN फुटांचे ड्रिल शेड उभारण्यात आले आहे. मैदानाच्या बाजूने तसेच ड्रील शेडमध्ये शस्त्राच्या माहितीचे ब पोलीस दलाविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

क्वॉर्टर गार्ड व आयुधिक शाळा - Image १

क्वॉर्टर गार्ड व आयुधिक शाळा

प्रशिक्षणार्थीसाठी तसेच शस्त्र कवायत व गोळीबार सरावाकरिता आवश्यक असणारे शस्त्र व दारुगोळा ठेवणेसाठी स्वतंत्र आयुधिक शाळा व त्यांचे संरक्षणाकरिता Het गार्ड कक्ष उपलब्ध आहे.

सह्याद्री परिषद कक्ष - Image १

सह्याद्री परिषद कक्ष

पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील ऐतिहासिक चर्च मध्ये सुसज्ज असा सह्याद्री परिषद कक्ष असुन त्या मध्ये वेळोवेळी प्रशिक्षणा संदर्भातील महत्वाच्या मिटींग घेतल्या जातात.

योग कुटीर - Image १
योग कुटीर - Image २
/

योग कुटीर

प्रशिक्षणार्थींसाठी योगासने आणि ध्यानधारणा करण्यासाठी एक योग कॉटेजची स्थापना करण्यात आली आहे.

प्रेरणा स्थळे - Image १
प्रेरणा स्थळे - Image २
प्रेरणा स्थळे - Image ३
प्रेरणा स्थळे - Image ४
/

प्रेरणा स्थळे

देशभक्तीची प्रेरणा देणारा स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, मनःशांतीचे दर्शन घडवून आणणारा गौतम बुद्धांचा पुतळा, महिला पोलीस अंमलदाराचे आदर्शरुप दर्शविणारा पुतळा अशी अनेक प्रेरणास्थाने प्रशिक्षण केंद्राच्या शोभेत अमूल्य अशी भर टाकतात.

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

२४/७ प्रशिक्षण समर्थन

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

हजारो पुस्तके आणि डिजिटल संसाधने

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

१०+ आधुनिक वर्गखोल्या

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार

पूर्ण राजधानी सुविधा

शिस्त, सचोटी आणि सेवेसह उद्याच्या पोलीस दलाचा आकार