निलाक्षी दिलीप हाडळ
पी.टी.सी. नं. ३०७, सत्र ३८
स्वप्नपूर्ती झाले माझे जेव्हा पी.टी.सी. खंडाळा सेंटर मिळाले मला भरती झाल्यापासून ज्या सेंटरची वाट बघत होती तेच भेटले आता. मुख्यालय पासून खंडाळा पर्यंत केलेल्या त्या दिवसाचा प्रवास लागली होती मला त्या सेंटर ची आस. ११ डिसेंबरच्या दिवशी आले सर्व काही अनोळखी होते मला, पार गोंधळून गेल होते तेव्हा पण कधी एकवट झाले या पी.टी.सी. मध्ये कळलेच नाही मला पी.टी.सी.चा भाग झाली होते आता. थंडीचे दिवस सुरु होते. खंडाळ्याची पहाटेची ती गुलाबी थंडी, रात्रीचे चंद्र ताऱ्यांनी भरलेले आकाश, सर्वत्र गारवा पसरलेला असायचा. झाडांची पानं गहत होती, काही झाडांना नव्याने पालवी येत होती. आमची पण त्यांच्यासारखी नव्याने सुरुवात झाली होती. खंडाळ्याचे निसर्गाचे वर्णन करायचे तेवढे अपुरेच. कारण ज्या ठिकाणी आम्ही होतो तो स्वर्गाइतका सुंदर नजारा, पहाटे पक्षांची मंजुळ गाणी आणि रोज सकाळी ग्राउंड वर त्या अनोळखी पक्षाची वाजणारी शीट्टी जणू आम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असायची. पावसाचे दिवस सुरु होण्यापूर्वीच मे मध्ये पावसाने हजेरी लावली होती. धो धो न थांबणारा पाऊस रोज कोसळत होता. चैतन्य वॉटर फॉल्स वरून पडणारे पाणी मन शांत करणारे असायचे. चारही बाजूने हिरवळीची शाल पांघरून निसर्ग ऐटीत डोलत होता. वाऱ्याच्या वेगाने धावणारे धुके जणू काही ढग जमिनीवर उतरल्यासारखे दिसायचे. हे क्षण डोळ्यांच्या नजरेत साठवून ठेवण्यासारखे होते. खंडाळ्यातील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतु आम्ही अनुभवले. आऊटडोअरची मज्जाच वेगळी होती. सकाळी कानावर पडणारा आवाज, प्रशिक्षणाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन, स्कॉडमधील अनुभव हे सर्व आठवणींचा अमूल्य ठेवा आहेत. शेवटी, १८ ऑगस्टला पी.टी.सी.तील प्रवास संपला, पण अनुभव, मित्रत्व आणि शिकवणी कायम राहील.