कपाली कैलास घुगे
पी.टी.सी. नं. ८२, सत्र ३८
पी.टी.सी. खंडाळा आणि येथील ट्रेनिंगबद्दल..
आयुष्याच्या पुस्तकातील एक अविस्मरणीय आठवणींच पान म्हणजे पी.टी.सी. खंडाळा मधील आमच ट्रेनिंग मनात असंख्य वादळ घेऊन काही प्रमाणात भिती तर जराशी उत्सुकतेची चाहुल होती. पी.टी. सी. च्या नियमांबद्दल आणि शिस्तीबद्दलची वार्ता मुख्यालयात असतानाच कानावर आलेली. अनोळखी चेहरे अनोळखी नावे, वेगवेगळ्या जिल्हयातील वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, प्रत्येकाची वेगळी कहाणी, प्रत्येकाची प्रेरणा वेगळी, संघर्ष वेगळा, जिद्ध वेगळी पण ध्येय मात्र एकच- महाराष्ट्र पोलीस.
१४ ऑक्टोबर २०२४ पासून पोलीस खात्यात सुरु झालेला माझा प्रवास ११ डिसेंबर २०२४ रोजी एका सुंदर वळणावर येऊन थांबला. पोलीस खात्याच्या प्रवासातील एक स्टॉप म्हणजे पी.टी.सी. खंडाळा, अनोळखी असूनही कधी आपलेस केल याची जाणीवही झाली नाही. १२ डिसेंबर २०२४ पासून ट्रेनिंग सुरू झाल. काही दिवस वर्किंग नंतर सुरू झाली काहीही झाल तरी कधीच न चुकणारी रनिंग आणि दिवसभराची धावपळ, रनिंगमधून थांबल की टोणे सरांच्या अतरंगी पनिशमेंट तयारच असायच्या.
आमच्या सत्राचे वाह्यवर्ग सत्र समन्वयक आर. पी. आय घोडे सर, मा. प्राचार्य सर, मा. प्राचार्या मॅडम आणि अन्य इनडोअर व आऊटडोअर शिक्षकांचे मार्गदर्शन आम्हाला खूप काही शिकवून गेले. शिस्त, धैर्य, निर्णयक्षमता आणि मैत्री याचे महत्व आम्ही येथे शिकले.
१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी केलेल्या परेडसाठी मिळालेला रिवॉर्ड असो किंवा शिस्त न पाळल्यामुळे मिळालेला रगडा, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवण मनाच्या सोनेरी तिजोरीत जपून ठेवली. पी.टी.सी. मध्ये तिन्ही ऋतू अनुभवले, रोपट्यापासून मोठा वटवृक्ष आम्ही घडलो.
हे दिवस पुन्हा येत नाहीत, पण आठवणींमध्ये पुन्हा पुन्हा जगता येतात. होस्टेल आणि मेस ही दोन ठिकाणे खास राहिली. स्वयंभू गणपती बाप्पाचे आशिर्वाद आम्हाला नेहमी लाभो. हा स्टॉप, हे ठिकाण, हे दिवस, ही माणसं नेहमीच खास राहतील.